मिडसांगवी ,ता.पाथर्डी, जि.अहमदनगर [email protected]
या संकेतस्थाळावर आपले स्वागत आहे. Welcome to the Portal!

25

यशस्वी वर्षे शिक्षण सेवेची

5500

विद्यार्थी संस्थेमधून आजतागायत उत्तीर्ण

30

विद्यार्थी खेळामध्ये जिल्हा पातळीवर विषेश प्राविण्य

03

यशस्वी शाळा आणि कॉलेज


मा. रमेश वाघ सर (संस्था प्रमुख)
संस्थेविषयी

श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, मिडसांगवी येथे आपले स्वागत आहे.

राष्ट्रसंत श्री भगवान बाबा, भिमसिंह महाराज भगवानगड यांच्या पवित्र भूमिमधे व संतांच्या विचाराने प्रेरीत होऊन ग्रामदैवत सालसिद्ध बाबा देवस्थान च्या आशिर्वादाने सन १९९५ साली श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ मिडसांगवी ता. पाथर्डी जि. अहमदनगर या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सुवर्ण गणेश मंडळाच्या संकल्पनेतून शिक्षणाचा श्री गणेशा सुरु करण्याचे महान कार्य हाती घेण्यात आले.

पाथर्डी तालुका नेहमी पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो, मात्र शैक्षणीक दृष्ट्या विकसनशील आहे. मला माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले . माझ्या गावातील मुलांना या अडचणी येऊ नयेत तेंव्हा पासून मनात एक उर्जा निर्माण झाली होती . 'अंतरी पेटवू ज्ञानज्योत' हे आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे . त्यामूळे ही ज्ञानज्योत पेटविण्यासाठी ऊसतोडणी कामगारांच्या व गोरगरीब मुला मुलींसाठी इ.१२ वी पर्यंतची शैक्षणीक सुविधा गावातच निर्माण केल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन व मुलींचे बालविवाह रोखण्यात उल्लेखनीय यश मिळाल्याचा मनस्वी आनंद मला होत आहे.

आमच्या संस्थेअंतर्गत शाळेतील अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय पदावर कार्यरत आहेत. ही संस्थेसाठी भूषणाची बाब आहे. अनेक संकटावर मात करीत संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी रौप्यमहोत्सव हा कार्यक्रम लोकनेते मा. आमदार निलेश जी लंके साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमधे शाही दिमाखदार सोहळा संपन्न झाला .

सद्यस्थितीमधे संस्थेच्या दोन माध्यमिक शाळा व एक ज्युनिअर कॉलेज सुरु आहे. एका छोट्याशा रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर होताना पहावयाचे भाग्य मला लाभले याचा मनस्वी आनंद होत आहे .विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्याधुनिक भौतीक ,शैक्षणीक सुविधा देण्यासाठी मी सतत कार्यरत आहे . भविष्यात अनेक सामाजीक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यामधे संस्थेचे सचिव श्री बाळासाहेब वाघ व संस्था पदाधिकारी तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि मित्रपरिवार यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे .

मा. रमेश वाघ सर
संस्था प्रमुख
श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ मिडसांगवी.

विश्वस्त मंडळ

रौप्यमहोत्सव



श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ मिडसांगवी ता. पाथर्डी जि. अहमदनगर या संस्थेने संघर्षमय रीतीने यशस्वी वाटचाल करीत २५ वर्षे पूर्ण केल्याबददल दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रौप्यमहोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रम घेण्याचा मुख्य हेतू हा होता की, संस्थेने हाती घेतलेले सर्व कामे यशस्वी पणे पूर्ण झाल्यामुळे स्वप्नांची पुर्तता झाली होती. व ही कामे पूर्ण करत असताना ज्यांनी शाळेला, प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत केली, सहकार्य केले, ज्यांनी संस्थेला प्रेरणा दिली व भक्कम आधार दिला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ऋणपूर्ती करण्याचा संस्थेचा मानस होता .

म्हणून संस्थेने रौप्यमहोत्सव, स्वप्नपुर्ती व ऋणपूर्ती हा त्रिवेणी संगमाचा बहारदार कार्यक्रम संपन्न केला याचा मनस्वी आनंद संस्था-पदाधिकारी, सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांना झाला आहे. हा कार्यक्रम सर्वांच्या अविस्मरणीय राहिल .

मा. रमेश वाघ सर
संस्था प्रमुख

अभिप्राय

मा.आमदार श्री निलेशजी लंके

पारनेर विधानसभा

श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ मिडसांगवी ता. पाथर्डी या ऊसतोडणी कामगाराच्या भागामध्ये स्थापन केलेल्या संस्थेने गोरगरीब लोंकाच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. या संस्थेने अतिशय कठीण परिस्थितीत वाटचाल करून रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमामध्ये संस्थेंबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. या संस्थेचे संस्थाप्रमुख श्री रमेश वाघ सर हे पेशाने स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी संस्थेच्या भरभराटी साठी केलेला प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे. या संस्थेचे वट वृक्षात रूपांतर होवो ही ईश्वर चरणी मनोकामना व संस्थेला हार्दिक शुभेच्छा.

मा आमदार श्री रोहितदादा पवार

जामखेड /कर्जत विधानसभा

श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ मिडसांगवी ता.पाथर्डी या संस्थेचे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिऊर हे विद्यालय माझ्या मतदार संघात आहे. तालुका स्तरीय क्रीडा साहित्य ( किट ) वितरण कार्यक्रमानिमित्त शाळेला भेट देण्याचा योग आला. शाळेतील मुलांचे खेळ व एकांकीका पाहून मन भारावून गेले .श्री नवनाथ आरोळे सर यांनी मुरमुऱ्यापासून केलेल्या अप्रतिम हाराने केलेले स्वागत अविस्मरणीय राहिल. शाळेतील मुलांची गुणवत्ता खूप छान होती. शाळेतील सर्व शिक्षकांना व संस्थेला पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा.

मा. श्री विजय आमटे

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख, दौलावडगाव ,आष्टी

श्री.रमेश वाघ हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक असताना मिडसांगवी सारख्या ग्रामीण आणि डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यालय सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले आणि मोठ्या हिमतीने, खडतर संघर्ष करून ते पेलले, ही अतिशय दैदिप्यमान प्रेरणादायी वाटचाल आहे. त्यांना सचिव श्री बाळासाहेब वाघ यांची भक्कम साथ मिळाली .अनौपचारीक प्रसंगानुरूप भेटीने ते माझे स्नेही झाले आणि या विद्यालयाच्या जडणघडणीत मलाही अल्पसे योगदान देता आले हे माझे भाग्य. ' संस्था आता शैक्षणिक प्रगतीपथावर असून या भागातील हे फार मोठे विद्या संकुल व्हावे,' या मन : पुर्वक शुभेच्छा .

श्री संजय फुंदे सर

अध्यध्य भगवान प्रतिष्ठान पाथर्डी

श्री नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ मिडसांगवी या संस्थेचे माध्यमिक विद्यालय मिडसांगवी येथे विद्यालय चालू आहे ही शाळा शासनाच्या अनुदानापासून बरेच दिवस वंचित होती. या शाळेला अनुदानास पात्र करण्यासाठी मला ही योगदान देण्याची संधी मिळाली. याचा मनस्वी आनंद आहे या शाळेच्या व संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

संपर्क

अधिक माहितीसाठी संपर्क करा